Mumbai Heavy Rains: विक्रमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पाणी साचलं, तरी निचरा वेगाने; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

Mumbai Heavy Rains update in marathi: दक्षिण मुंबईत मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर लाटा उसळल्या आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात जमले आहेत. पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना समुद्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
cm eknath shinde
cm eknath shindeesakal
Updated on

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत 267 ते 300 मिमी पाऊस पडला आहे. 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टी समजली जाते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. चुनाभट्टी आणि सायन येथे पाणी भरले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना

रेल्वेचे 200 आणि BMC चे 481 पंप चालू आहेत. मिलन सब वे मध्ये पाणी साचले नाही कारण तिथे पंप काम करत आहेत. होल्डिंग पॉईंट आणि मायक्रो टनेलिंगमुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेल्वे प्रशासनाशी सकाळपासून संपर्कात असून कोणत्या लोकल थांबल्या आहेत आणि कोणत्या सुरू आहेत याची माहिती घेतली आहे. आता लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

दक्षिण मुंबईतील परिस्थिती-

दक्षिण मुंबईत मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर लाटा उसळल्या आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात जमले आहेत. पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना समुद्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हायटाइडची भीती व्यक्त केली जात आहे.

लष्कर, नौदल, हवाई दलाला अलर्ट-

विक्रमी पाऊस पडल्याने पाणी साचले आहे. लष्कर, नौदल, हवाई दलाला अलर्ट केले आहे. 60 पंपिंग स्टेशन सुरू झाल्यावर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. सर्व यंत्रणा मिळून काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, "मला राजकारण करायचे नाही, सध्या लोकांना मदत करायची आहे."

cm eknath shinde
Mumbai Worli Hit and Run: शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा, दहावी पास...वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे?

इतर उपाययोजना-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल रात्रीपासून मुंबईत 200 ते 300 मिमी पाऊस पडला आहे. होल्डिंग पॉईंट आणि मायक्रो टनेलिंगचा चांगला फायदा झाला आहे. आपल्या राज्याच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन आले आहे. कोकणातील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.

रेल्वे, पालिका, स्टेट डिजास्टर, एनडीआरएफ ह्या टीम काम करत आहेत. पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेसवरील ट्राफिक सुरळीत आहे. नवीन मोगरा आणि पोइसर पंपिंग स्टेशन सुरू करत आहेत. मिठी नदीला पंप गेट बसवले आहेत. चौपाट्यांवर नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी सूचना-

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना गरजेशिवाय घराबाहेर न येण्याची सूचना दिली आहे. शाळांना सुट्टी दिली आहे. सगळी काळजी घेण्यात आली आहे. पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. स्थानिक यंत्रणा सज्ज आहे. आज राजकारण करण्याचा दिवस नाही, आज लोकांसाठी काम करण्याचा दिवस आहे.

cm eknath shinde
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे साचले पाणी; 'या' स्थानकांवरील लोकलसेवा विस्कळीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.