Ulhasnagar Shivsena: विधानसभेच्या तोंडावर खळबळ, उल्हासनगर शिवसेना आणि महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश

CM EKnath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची जिल्हाप्रमुखांकडून अंमलबजावणी, विधानसभेच्या तोंडावर खळबळ
Ulhasnagar
Ulhasnagar shivsenasakal
Updated on

उल्हासनगर,ता.15-ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगरातील शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त केल्याने खळबळ उडाली आहे.उल्हासनगर सह अंबरनाथची कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक पार पडली असून त्यात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.मात्र लोकसभेत शिवसेने सोबत भाजपा,राष्ट्रवादी,रिपाइं आठवले गट,जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी,साईपक्ष,टीम ओमी कालानी आदींनी एकत्रित काम केले असतानाच हवे तेव्हडे मताधिक्य मिळाले नसल्याने कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.या मुख्य कार्यकारिणीतील महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज,रमेश चव्हाण यांच्या सह सर्व उपशहरप्रमुख,संघटक,विभागप्रमुख या सर्वांची पदे बरखास्त करण्यात आली आहेत.

Ulhasnagar
Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

यात युवासेनेला वगळण्यात आले आहे.त्यामुळे कल्याण जिल्हा युवासेना उपजिल्हाध्यक्ष युवराज पाटील,कल्याण जिल्हा सचिव विक्की भुल्लर,उल्हासनगर युवासेना(पश्चिम)शहराध्यक्ष बाळा श्रीखंडे, शहराध्यक्ष(पूर्व)सुशील पवार यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यावर शुक्रवारी 19/7/24 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुद्वारा,सी ब्लॉक,उल्हासनगर 3 येथे मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.यासंदर्भात माजी शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांनी आम्ही लोकसभेत इमानेइतबारे काम केले आहे.असे स्पष्ट करताना आमचे कुटुंब सदैव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या सोबत असल्याची माहिती दिली.

Ulhasnagar
Ulhasnagar: अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.