राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात युत्या-आघाड्यांमधील मित्रपक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच करत आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजपविरोध बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयाला विरोध करत शिवसेना शिंदे गटाने कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.