ठाणे - ‘शिवसेना ही बाळासाहेबांचीच असून काही वर्षांपासून गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्ही आगीत उडी घेतली,’ असे स्पष्टीकरण ठाण्यात महायुती पदाधिऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना ही एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांची मालमत्ता नसून ती बाळासाहेबांची असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मशाल चिन्ह क्रांतीची नसून घर जाळणारी असल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळताना केली.