INDIA Alliance Meeting in Mumbai : 'इंडिया नव्हे इंडी'; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं विरोधकांच्या आघाडीला नवं नाव

CM eknath shinde Slam INDIA Alliance Meeting in Mumbai Corrects opposition alliance name Video
CM eknath shinde Slam INDIA Alliance Meeting in Mumbai Corrects opposition alliance name Video
Updated on

Mumbai News : विरोधकांच्या 'इंडिया' आगाडीची आज (शुक्रवार) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या या बैठकीवर टीका केली आहे. सगळे विरोधक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. लोकांनी मोदींना पंतप्रधान पदी निवडण्याचा निर्णय केला असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडीच्या बैठकीचा महायुतीवर किती परिणाम होईल? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "ती इंडिया आघाडी नसून ती इंडी आघाडी आहे. I.N.D.I.A असं आहे, मध्ये डॉट आहेत. ज्या विरोधकांची ही बैठक झाली ते २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून हे विस्थापित झाले आहेत.

२०१४ मध्ये त्यांनी प्रयत्न केले. २०१९ मध्ये केले. पण २०१९ साली मोदी यांच्या अधिक जागा आल्या आणि ते पंतप्रधान बनले. लोकांनी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींना निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे."

CM eknath shinde Slam INDIA Alliance Meeting in Mumbai Corrects opposition alliance name Video
Video : 'आदित्य एल-1'चं काउंटडाऊन सुरू; प्रक्षेपणापूर्वी इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतलं श्री वेंकटेश्वर मंदिरात दर्शन

"लोकांना विकास पाहिजे, लोकांना भांडणं नको आहेत. आज किती टोळ्या आल्या आहेत. त्यांचे नावे बघितले तरी लक्षात येईल की मोठमोठे घोटाळे त्यांच्या नावावर आहेत. हे यापूर्वीही एकत्र आले होते. पण यामुळे काही फरक पडणार नाही.

त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी जनतेने ठरवलं आहे. एका सर्व्हेमध्ये समोर आलं की ८५ टक्के लोक मोदींना पुन्हा पंतप्रधान पदी पाहू इच्छीतात. हे सगळे (विरोधक) एकत्र येत आहेत हाच मोदींचा विजय आहे" असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

CM eknath shinde Slam INDIA Alliance Meeting in Mumbai Corrects opposition alliance name Video
Maharashtra Politics : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी महायुतीची 'वर्षा'वर बैठक; लोकसभेसाठी केला महत्वाचा संकल्प

शिंदेंचं 'वन नेशन, वन इलेक्शन'ला समर्थन

मोदी सरकारने शुक्रवारी (1 सप्टेंबर 2023) एक देश, एक निवडणूक या विषयावर एक समिती स्थापन केली असून, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच केंद्र सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन देखील बोलावले आहे. या अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणणार असल्याच्या चर्चा आहेत.

यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन नेशन, वन इलेक्शन या धोरणाचे देखील स्वागत केले आहे. "मी 'वन नेशन, वन इलेक्शन'चे स्वागत करतो. यामुळे निवडणुकीवर खर्च होणारा पैसा वाचेल आणि तो पैसा कल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल आणि केंद्र सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय लोकांच्या हिताचेच आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.