मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच श्रीरामाच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. यासाठी तयारी सुरु झाली असून अयोध्येतून त्यांना खास निमंत्रण आलं आहे. त्यानुसार त्यांचा लवकरच अयोध्या दौरा होणार असल्याचं बोललं जात आहे. (CM Eknath Shinde will visit Ramlalla in New Year date fixed for Ayodhya tour)
सुत्रांच्या माहितीनुसार, महंत शशिकांत दास आणि महंत शत्रुघ्न दास हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहेत. अयोध्येला येण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, यावेळी मुख्यमंत्र्यांचा त्यांनी भगवी शाल देऊन सत्कारही केला. मुख्यमंत्री हे आमंत्रण स्विकारतील त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते अयोध्या दौरा करतील, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अयोध्येचा दौरा केला होता. पण आता उद्धव ठाकरेंपासून दूर झाल्यानंतर आपणचं कसे कट्टर हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतील. त्यासाठी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन, शरयू नदीची आरती असे सोपस्कार पार पाडतील, असंही सांगितलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.