मराठा समाजाच्या आरक्षण व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मराठा समाजातल्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार विनायक मेटे यांनी ही बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत मराठा समाजाचे विविध प्रश्न चर्चेला येणार असल्याचे मेटे यांनी कळवले आहे. मराठा आरक्षणाची २५ जानेवारी २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुरू होणारी सुनावणी, नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांचा प्रश्न, लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेबाबत मराठा समाजावर अन्याय करणारे परिपत्रक काढणे,आर्थिक दुर्बल गटा चे लाभ मराठा समाजाला देण्याबाबत समाजात असलेला संभ्रम यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
२० डिसेंबर २०२१ रोजी मराठा समाजाची याच विषयांवर राज्यस्तरीय बैठक वडाळा, मुंबई येथे झाली होती. सदरच्या सभेत मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक लावून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली होती. सदरच्या मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मराठा समाजाच्या उपरोक्त विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्याचे निश्चित केलं.
मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गाच्या तरुणांवर अन्याय करणारे शासन निर्णय सध्याच्या काळात काढून मराठा समाजाला सर्व प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे षडयंत्र चालवले आहे असा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी आपले वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून एकत्र येणे व मराठा समाजाचे विषय सोडवण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही नेते, मराठा संघटनांचे प्रमुख, मराठा समाजातील अनेक वर्षे काम करणारे नेते या सर्वांनी कोण छोटा, कोण मोठा असा विचार न करता सदरच्या बैठकीस उपस्थित राहून मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सरकारसोबत असलेल्या बैठकीत सहभागी व्हावे. तरी सदरच्या बैठकीस निमंत्रित केलेल्या सर्व नेत्यांनी बैठकीस उपस्थित राहून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमीका निभावावी असे आवाहन मेटे यांनी केले आहे.
cm uddhav thackeray to conduct meeting regarding maratha reservation and pending topics related to maratha
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.