मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात दिली महत्त्वाची माहिती, केलं सतर्क राहण्याचं आवाहन

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात दिली महत्त्वाची माहिती, केलं सतर्क राहण्याचं आवाहन

Published on

मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस राज्यात तळं ठोकून आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

कोरोनाबाधित ८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा रुग्णांकडून कोरोनाचा धोका पसरण्याचा जास्त धोका असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत कोविड रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या लोकार्पणावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला कोरोनाची सद्यस्थिती समजावत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात राज्यात केवळ कोरोना चाचणी करण्यासाठी दोनच लॅब होत्या. मात्र आता राज्यात २८५ कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यात आल्यात, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Cm Uddhav Thackeray give important information about corona virus

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.