फडणवीसांसोबत बैठक संपताच मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, अपक्ष आमदारांसोबत...

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal
Updated on

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्याआधीच खलबतं सुरू झाली आहेत. (Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis)

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर दाखल झालं. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. (Chhagan Bhujbal on Rajyasabha Election 2022)

मात्र माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी बैठकीत चर्चेला आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. या प्रस्तावावर फडणवीसांनी उलटा गेम करत मोठी ऑफर दिली आहे. यासाठी त्यांनी थेट दिल्लीला पक्षश्रेष्ठींना फोन फिरवला. (Rajyasabha Election 2022)

यानंतर शिवसेनेने सावध पवित्रा घेत स्पष्ट होकार देण्याबद्दल अद्याप मौन बाळगलं आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत नव्याने प्लॅन आखला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. सध्या सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारी मतं अपक्ष आमदार पुरवणार आहे. त्यामुळे या मतांवर सहाव्या उमेदवाराचा दिल्लीचा रस्ता ठऱणार आहे.

सध्या भाजपने मविआच्या शिष्टमंडळाला काऊंटर ऑफर देत राज्यसभा निवडणूक बिनविरोध कऱण्याचं सांगितलंय. हाच प्रस्ताव भुजबळ यांनी फडणवीसांना दिला होता. मात्र, राज्यसभेसाठी जागा सोडायची असल्यास विधान परिषदेवर कोण जागा काँम्प्रमाईज करणार यावर अद्याप एकमत झालेलं नाही.

जागा शिवसेनेनेच सोडावी

महाविकास आघाडीत राज्यसभा बदल्यात एक जागा विधान परिषदेची देण्याची ऑफर आहे. पण ही जागा नेमकी कोणाची कमी होणार यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर येतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन जागा लढवणार याबाबत ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनाला आता दोन जागा राज्यसभा लढवायची असेल तर एक जागा विधान परिषद कमी करावी लागणार असल्याचं दिसतंय. हीच भूमिका भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे. आता राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना विधान परिषदेची एक जागा कमी लढवणार का, याकडे लक्ष्य लागलंय.

मुख्यमंत्र्यांचा नवा डाव

बैठकींमधून अद्याप तोडगा निघत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली आहे. येत्या 6 जूनला सायंकाळी 5 वाजता अपक्ष आमदारांची बैठक वर्षावर पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

'ट्रायडेंट हॉटेल'वर रुम बूक

अपक्ष आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर रहाण्यासाठी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना ८ ते १० जून अशी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर रहाण्यासाठी येण्याचे शिवसेनेने आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()