"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."

निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."
Updated on
  • निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कोरोनाकाळात (Coronavirus) महाराष्ट्रातील जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे कायम आवाहन (Appeal) करताना दिसतात. विरोधक त्यांच्या कार्यपद्धतीची (Working Style) अनेकदा टिंगल करतानाही दिसतात. भाजपचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारच्या (MVA Govt) कार्यपद्धतीवर वेळोवेळी रोखठोक शब्दांत टीका केली. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. (CM Uddhav Thackeray slammed by BJP Nilesh Rane over Balasaheb Thackeray Ideology)

"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."
आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; सह्याद्री गेस्ट हाऊसवरील घटना

देशासाठी आणि राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं. सध्या देशात जे संकट आहे, ते साधंसुधं नाही. या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल. (मुख्यमंत्रीपदाची) खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, असं उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यावरून निलेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली. "काय नाटक आहे... प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचं गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले", अशा शब्दात निलेश राणेंनी त्यांच्या कार्यपद्धतीला टोला लगावला.

"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."
कोविडचा धसका! सुरक्षित संबंधांना मुंबईत प्राधान्य

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे...

"लॉकडाऊन किती काळ चालवायचा आहे हे आम्हालाही माहिती नाही. माझी प्राथमिकता ही जीव वाचवण्याला आहे. घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ उरणार? माझं म्हणणं आहे की जे-जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं. अशा परिस्थितीत राजकारण थांबवावं. (मुख्यमंत्रीपदाची) खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन. माझं हे वचन सुरू झालंय पण अजून पूर्ण झालेलं नाही. मी जबाबदारी घेतली. खुर्ची हे वैभव आहे. ज्यांना माझी खुर्ची खेचायची आहे त्यांना माझं सांगणं आहे की माझी खुर्ची खुशाल खेचा आणि तुम्ही बसा. पण काम करा. माझ्यापेक्षा दुसरा चांगलं काम करत असेल मलाही आनंदच आहे", असे विचार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

"काय नाटक आहे.. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्..."
"सरकारने अशा घुबडांची काळजी न करता..."; संजय राऊतांचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()