उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांत राजीनामा दिला नाही, तर त्यांचे बाबा सिद्धिकीसारखे होईल, असे लिहिले आहे. या घटनेनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.