CNG-PNG Price Hike : महागाईच्या झळा सोसत असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ पोहचणार आहे. 2022 मध्ये पाचव्यांदा मुंबईत 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत.
CNG आता 86 रुपये प्रति किलो वर उपलब्ध होईल, जी 6 रुपयांची वाढ आहे आणि घरगुती PNG 52.50 रुपये प्रति एससीएम (SCM) मध्ये उपलब्ध होईल, पीएनजीमध्ये झालेली वाढ ही 4 रुपयांची असून या किंमतीमध्ये यापूर्वी 12 जुलै रोजी वाढ झाली होती.
दरम्यान इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ लक्षणीयरीत्या जास्त असल्याने, MGL ने अशा वाढलेल्या गॅसच्या किमती वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, MGL ही 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात CNG ची किंमत 6 रुपये आणि घरगुती PNG ची किंमत 4/SCM ने वाढवण्यात येत आहे असे महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.