Dombivli News : तीन दिवसांसाठी सीएनजी पेट्रोल पंप बंद; ठराविक पंप चालू वाहनांच्या रांगाच रांगा

अंबरनाथ येथील मुख्य गॅस वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम भारत गॅस प्रधिकरणाकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे.
CNG petrol pumps closed for three days queues of certain pump running vehicles
CNG petrol pumps closed for three days queues of certain pump running vehiclesSakal
Updated on

डोंबिवली - अंबरनाथ येथील मुख्य गॅस वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम भारत गॅस प्रधिकरणाकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी अंबरनाथसह कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली परिसरातील महानगर गॅसचे सीएनजी पंप येत्या शनिवार पर्यंत म्हणजेच 9 फेब्रुवारी पर्यत बंद राहणार आहेत, असे महानगर गॅसने जाहीर केले आहे.

हे समजताच रिक्षा चालकांनी जवळील पंपावर जाऊन गॅस टाकी फुल करण्यासाठी धाव घेतली मात्र सकाळ पासूनच अनेक ठिकाणी बंदचे फलक झळकलेले त्यांना दिसून आले. भारतीय गॅस प्राधिकरणाकडून अंंबरनाथ येथील सिटीगेट स्टेशन पंपाला गॅस पुरवठा केला जातो.

या केंद्रातून परिसरातील पंपांना तो वितरित केला जातो. अंबरनाथ येथील मुख्य गॅस वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने भारतीय गॅस प्रधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील सीएनजी गॅस पुरवठा पंपांवर त्याचा परिणाम होणार आहे.

या कालावधीत वाहन चालकांची गैरसोय नको म्हणून जिल्ह्यातील काही सीएनजी पंंपांवर गॅस मिळेल अशी व्यवस्था केली आहे, असे महानगर गॅसने स्पष्ट केले आहे. तीन दिवस सीएनजी पंप बंद राहणार असल्याची माहिती मिळताच रिक्षा चालकांनी गैरसोय नको म्हणून डोंबिवली, कल्याण, शिळफाटा, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरातील महानगर गॅसच्या सीएनजी पंपांकडे धाव घेतली. पण तेथे बंदचे फलक रिक्षा, खासगी वाहन चालकांना आढळून आले.

डोंबिवली, कल्याण भागातील अनेक रिक्षा चालकांनी भिवंडी परिसरात जाऊन महानगर गॅसच्या पंपावर गॅस भरण्याचे प्रयत्न केले. बुधवारी रात्रीपासून रिक्षा चालक सीएनजी पंपांवर गॅस मिळेल या अपेक्षेने रिक्षा घेऊन धावत आहेत. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडली.

एकदा रिक्षेत चार किलो सीएनजी भरला की त्याव्दारे दोन ते तीन दिवस अनेक रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. इंधनाची बचत व आर्थिक फायदा होत असल्याने रिक्षा चालक सीएनजीला पसंती देत असल्याचे रिक्षाचालक संतोष वाळुंज यांनी सांगितले.

अनेक रिक्षाचालकांना सीएनजी भरता न आल्याने त्यांना तीन दिवस पेट्रोल टाकून प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. पेट्रोल महाग असल्याने सीएनजीला प्राधान्य दिले जात आहे. सीएनजी न मिळाल्याने अनेक चालकांनी गुरुवारी दुपारी आपल्या रिक्षा बंद ठेवल्याचे चित्र दिसुन आले.

रिक्षा, खासगी वाहन चालकांची गैरसोय म्हणून ठाणे जिल्ह्यातील महानगर गॅसने 22 सीएनजी पंपांवर गॅस मिळेल अशी व्यवस्था केली आहे. यामध्ये इंंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोल पंप आणि खासगी पंप चालकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.