CNG PNG Price: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सीएनजी-पीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये मोठी घट, जाणून घ्या नवे दर

MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight today
MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight todayesakal
Updated on

मुंबई- मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने याबाबत निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्रीपासूनच हे दर लागू होणार आहेत. घरगुती वापर वाढावा आणि वाहन धारकांनी सीएनजी वाहनांचा वापर वाढवावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीमध्ये तीन रुपयांची तर पीएनजीच्या किंमतीमध्ये २ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पण, आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये काहीशी घट करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २ ऑक्टोंबरपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight today
Gas Tanker Accident : पुणे-सातारा महामार्गावर गॅस भरलेला टँकर पलटी; मोठी दुर्घटना टळली

नवे दर काय असतील?

मुंबई महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना ७६ रुपये प्रति किलोच्या दराने सीएनजी मिळेल. दुसरीकडे, पीएनजी ४७ रुपयांना मिळेल.सध्या सीएनजी वाहनांचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे सीएनजी वाहन धारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच अनेकजण अन्न शिजवण्यासाठी पीएनजीचा वापर करतात. त्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight today
Commercial LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

नागरिकांनी पर्यावरण पूरक इंधन वापरावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे. सीएनजीचा उपयोग करणारे ग्राहक पेट्रोलच्या तुलनेत ५० टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २० टक्के पैसे वाचवत आहेत. तसेच एलपीजीच्या तुलनेत पीएनजी अधिक स्वस्त आहे. शिवाय हे सुरक्षित आणि पर्यावरणाला अनुकूल असल्याचं सांगण्यात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()