Coastal Road Mumbai : कोस्टल रोडच्या कामात दिरंगाई, कंत्राटदारांवर ३१ कोटींचा दंड

त्यानंतर २०२० कोरोनाचे संकट आल्याने कामाची गती कमी झाली. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लांबल्याने दिलेली डेडलाईन हुकली.
Coastal Road Mumbai
Coastal Road Mumbaisakal
Updated on

Coastal Road Mumbai - कोस्टल रोडची डेडलाईन विविध कारणाने चुकली असली तरी सध्या या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या वर्षा अखेरीस प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. ही मदत कंत्राटदारांनी पाळला नाही.

त्यांना ३१ कोटी रुपयांचा दंड आकारल्याची माहिती माहिती अधिकारातून समारे आली आहे. दरम्यान काम लांबल्याने प्रकल्पाच्या खर्चात २२६ कोटींची वाढ झाली असून ६५ टक्के रक्कम कंत्राटदारांला अदा करण्यात आली आहे.

कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला.

त्यानंतर २०२० कोरोनाचे संकट आल्याने कामाची गती कमी झाली. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लांबल्याने दिलेली डेडलाईन हुकली. काम लांबल्याने प्रकल्पाचा खर्चातही २२६ कोटींची वाढ झाली असून ६५ टक्के रक्कम कंत्राटदाराला अदा करण्यात आली आहे. लेटलतिफ कंत्राटदाराला पालिकेने ३१ कोटींचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेने दिली आहे.

Coastal Road Mumbai
Jalgaon Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; महिलेस नाशिक येथून अटक

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम तीन भागामध्ये विभागले गेले आहे. भाग १ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो यास दिले असून मूळ खर्चात ९९.७९ कोटींची वाढ झाली आहे. मूळ खर्च ३५०५ कोटी अपेक्षित होता. २० जून २०२३ पर्यंत २२८६ कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे.

आतापर्यंत या कामात ८.५७ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. सदर काम पूर्ण करण्याची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. सद्या याची मुदत वाढवली असून १० सप्टेंबर २०२३ रोजी काम पूर्ण करावे लागणार आहे.

Coastal Road Mumbai
Pune : लोणी धामणी परिसराला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा आनंद मिळणार नाही; दिलीप वळसे पाटील

भाग २ अंतर्गत बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम मेसर्स एचसीसी- एचडीसी यास दिले असून मूळ खर्चात ६२.२५ कोटींची वाढ झालेली आहे. मूळ खर्च २१२६ कोटी रुपये अपेक्षित होता.

२० जून २०२३ पर्यंत ११९३ कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. या कामात १५.३७ कोटींचा दंड आकारला आहे. सदर काम पूर्ण करण्याची तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती. सद्या मुदत वाढ दिली असून ७ ऑक्टोबर २०२३ रोजी काम पूर्ण केले जाणार आहे.

Coastal Road Mumbai
Mumbai : सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच डोळ्यांची ओपीडीप्लास्टिक सर्जरी विभागही सुरू होणार

भाग ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो या कंपनीला देण्यात आले असून मूळ खर्चात ६३.८३ कोटींची वाढ झालेली आहे. मूळ खर्च २७९८ कोटी अपेक्षित होता. २० जून २०२३ पर्यंत २१६० कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे.

आतापर्यंत या कामात ७.२५ कोटींचा दंड आकारला आहे. सदर काम पूर्ण करण्याची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. सद्या मुदत वाढ दिली असून २६ नोव्हेंबर २०२३ रोजी काम पूर्ण होईल, अशी माहिती आरटीआयमधून गललगली यांना देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.