'कॉफी विथ सकाळ' कार्यक्रमात मांडली आपली रोखठोक भूमिका
मुंबई: सर्व नेतेमंडळींशी चर्चा करून राज्य चालवायचं असतं. पण आत्तापर्यंत आमची एकच बैठक झाली. आम्ही सत्तेत होतो तेव्हा त्यांना सोबत घेत होतो. काही प्रश्नांच्याबाबतीत तर विरोधी पक्षांना सोबत घेऊन केंद्राकडे गेलो होतो. पण, या सरकारचे केवळ तीन नेते पंतप्रधानांना भेटले. कारण महाविकास आघाडी सरकारची विचारधारा ही तिरस्काराची आहे", असे रोखठोक मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले. 'कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात ते बोलत होते.
लसीकरण मोहिमेबद्दल...
"आज बऱ्याच ठिकाणी खाजगी रुग्णालयात बऱ्यापैकी लसीकरण होत आहे. पण हे सरकार अधिक पैसे जातील म्हणून लस आणत नाहीत. केंद्र आता सगळ्यांना मोफत लस देणार आहे. आज लस आणि तिची उपलब्धता लक्षात घेऊन या लसी दिल्या जातील. त्यांना देशाचे नियोजन करायचे असते आणि गणित जमवायचे असते. त्यामुळे सारखं केंद्राकडे बोट न दाखवता, लसीकरणाच्या बाबतीत राज्य सरकार कुठेतरी कमी पडले हे मान्य करायला हवे", असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला.
आरक्षणाच्या मुद्द्यावर...
"आरक्षणाच्या बाबतीत कोर्टाला राज्य सरकारने जे काही सांगितले, त्यासाठी चालढकल केली जात आहे. ओबीसी, एससी यांना हे सरकार खेळवत आहे. छगन भुजबळ हे सत्तेतील नेते आहेत. मग त्यांना लोकांना सांगून रस्त्यावर यायची काय गरज आहे. त्यांनी खरं तर सरकारला सांगितलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण या विषयावर सरकारचा प्रत्येक वेळी निष्काळजीपणा दिसून आला. फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. त्यामुळे पंतप्रधान, राज्यपालांकडे जाऊन आरक्षण मिळते का? हे लक्षात घेतले पाहिजे.
मुंबई महापालिकेच्या तयारीबद्दल...
"मुंबईत राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही. या काळात भाजपने खूप काम केलेले आहे. कोरोना संकटकाळात भाजपाच्या लोकांनी अभूतपूर्व काम केलेलं आहे. तशातच सध्या वाहतुकीचा प्रश्न आणि इतर मुद्द्यांमुळे मुंबईकर त्रासले आहेत. मुंबईत 25 वर्षे शिवसेनेचे सरकार आहे. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते पण त्याचे काहीच केले जात नाही. भाजपचे आमदार, खासदार नगरसेवक मराठी आहेत. मराठी मतदार बाळासाहेबांनी त्यावेळी एकत्र बांधला होता. पण आता तीन पक्षांची सत्ता चालवताना उद्धव ठाकरे यांची चांगलीच तारांबळ उडते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.