Munawar Faruqui Video: कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरणारा मुनव्वर फारुकी आला लाईनवर, मागितली जाहीर माफी

Munawar Faruqui public apology Konkani people: मनसैनिक आक्रमक झाले होते. शिवाय, भाजप नेते नितेश राणे यांनी थेट इशारा दिला होता. वातावरण तापत असल्याचं पाहून मुनव्वर फारुकीने मागितली माफी.
Munawar Faruqui
Munawar Faruqui
Updated on

मुंबई- 'बिग बॉस'चा विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी एका शोमध्ये कॉमेडी करत असताना कोकणी लोकांबाबत अपशब्द बोलून गेला होता. त्याच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मनसैनिक आक्रमक झाले होते. शिवाय, भाजप नेते नितेश राणे यांनी थेट इशारा दिला होता. वातावरण तापत असल्याचं पाहून मुनव्वर फारुकीने माफी मागितली आहे.

प्रेक्षकांसोबत बोलताना मी कोकणच्या लोकांबाबत काही बोललो. तळोजामध्ये अनेक कोकणी लोक राहतात, अनेकजण तेथे माझे मित्र आहेत. मी कोकणी लोकांबाबत जे बोललो ते वेगळ्या पद्धतीने घेण्यात आलं. मला कोकणी लोकांबाबत काहीही वाईट बोलायचं नव्हतं, असं तो म्हणाले आहे.

Munawar Faruqui
Munawar Faruqui: ही कोकणी माणसं... मुनव्वर फारुकी बरळला; मनसे आक्रमक, पत्ता कळवण्याचे आवाहन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.