"...अन् आयुक्त चहल रडले"; मुख्यमंत्र्यांनी कथन केला 'तो' भयानक किस्सा

चहल यांच्या कोविड वॉरियर या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं प्रकाशन
CM Thackaray_Chahal
CM Thackaray_Chahal
Updated on

मुंबई : कोरोनाचा काळ आपल्यासाठी किती आव्हानात्मक आणि कठीण होता याचं कथन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी सोमवारी केलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल लिखित कोविड वॉरियर या पुस्तकाचं प्रकाश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. एकदा तर आयुक्त चहल माझ्यासमोर रडले हा किस्साही त्यांनी यावेळी कथन केला. (Commissioner Chahal wept in front of me CM Thackeray told horrible time)

CM Thackaray_Chahal
वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजायचे आता इतर भोंगे वाजतायत - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, वर्षभरापूर्वी कोरोना काळात भयानक बातम्या येत होत्या की, ऑक्सिजनची कमतरता आहे. एक दिवस मला आठवतोय सकाळी सकाळी चलह साहेबांचा मला फोन आला. हा खंबीर असलेला माणूस त्या दिवशी अक्षरशः फोनवरती रडत होता. त्यांना मी म्हटलं काय झालंय? ते म्हणाले, सर कालची रात्र माझ्या आयुष्यातली भयानक रात्र होती. त्या रात्री काय चाललं होतं ते कानावरती येत होतं. पण चहल सारखा माणूस फोनवरती रडत होता. सुदैवानं जे घडलं असतं ते आम्ही टाळलं होतं.

CM Thackaray_Chahal
केतकी चितळेचं सदाभाऊंकडून समर्थन; म्हणाले, ती कणखर...

त्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे होत नव्हता. त्यावेळी मुंबईमध्ये किमान दीडशे लोकं ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडले असते. पण वेळेत चहल आणि त्यांच्या सर्व टीमनं या रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट केलं त्यामुळं एकही मृत्यू आपल्याकडे घडला नाही. त्यावेळी औषधाचा तुटवडा होता. सुरुवातीला एन ९५ मास्क लोकांना माहिती नव्हते, कुठून आणायचं. पीपीई कीट कुठून आणायची? काही कळत नव्हतं. याची डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली होती. कोविड काळातील या सर्व गोष्टींचं संकलन होणं फार गरजेचं होतं. पन्नास-शंभर वर्षानंतर जर याची पुन्हा गरज पडली तर मुंबईत काय घडलं होतं ते कळू शकेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कुटुंबाला कोविड झाल्यानं मोठं दडपण होतं - मुख्यमंत्री

"तो झोप उडवणारा काळ होता दिवस-रात्र झोपचं येत नव्हती. मध्येतर आमच्या घरातील सर्वजण कोविडग्रस्त झाले. त्यामुळं मला एवढं दडपण आलेलं की आता जे. जे. मध्ये जाऊन अॅडमिट होऊ की आणखी कुठे? की घरातच उपचार घ्यायचे? पण नियम मोडायचा नव्हता. आम्ही पहिला कोरोनाचा डोस घेतल्यानंतर कोविड गेल्यात जमा होता. पण त्यानंतर २८ दिवसांनंतर सर्वकाही झपाट्यानं बदललं. दुसरा डोस घेताना बापरे!" अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर दडपण आल्याची कबुलीही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.