Wedding
Wedding sakal media

पालघर: ७०५ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा; राज ठाकरे व शर्मिला ठाकरे करणार कन्यादान

Published on

पालघर : मनसेतर्फे (MNS) पालघर जिल्ह्यातील सातशे पाच जणांचा सामुदायिक विवाह (community wedding ceremony) सोहळा उद्या, (ता. १३) विक्रमगड येथे होणार आहे. या विवाह सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व शर्मिला ठाकरे (sharmila Thackeray) या कन्यादान करणार आहेत.सामुदायिक विवाह सोहळ्याविषयी माहिती देण्यासाठी मनसेचे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पालघर येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Wedding
उष्म्यामुळे 'किडनी स्टोन' बळावतोय; आठवड्याला ९ ते १० रुग्ण

जिल्ह्यातील आदिवासी समाजातील एक हजार १११ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र आतापर्यंत ७०५ जोडप्यांची विवाहनोंदणी झाली आहे. या जोडप्यांचा सामुदायिक विवाह विक्रमगड येथे एका मैदानावर होणार आहे.

प्रत्येक जोडप्याला कपडे व संसारोपयोगी भांडी मोफत दिली जाणार आहेत. राज ठाकरे व शर्मिला ठाकरे कन्यादान करतील. तसेच विवाह सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी होणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. पत्रकार परिषदेच्या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष समीर मोरे, शहर अध्यक्ष सुनील राऊत, धीरज चुरी, दिनेश गवई उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()