Dombivli MIDC Blast: एक स्फोट... जमीन हादरली, संपूर्ण कंपनी बेचिराख; साखरपुडा सोडून लोक सैरावैरा पळू लागले

Thane, Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी फेज- २ येथील एका कंपनीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण स्फोट झाला आणि या स्फोटाच्या आवाजाने जवळपास संपूर्ण शहर हादरले.
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC BlastEsakal
Updated on

(Input: शर्मिला वाळूंज, सकाळ प्रतिनिधी आणि अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी)

डोंबिवली : दुपारी दोनच्या सुमारासची वेळ... डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील साईबाबा मंदिराच्या परिसराच साखरपुडा सोहळा सुरू होता... दोन्ही बाजूची मंडळी आनंदात होती पण स्फोटाचा आवाज आला सगळ्यांचा थरकाप उडाला... मंदिरातील काचा फुटल्या होत्या, पीओपी उखडले... परिस्थिती बघून साखरपुड्याला जमलेली मंडळी सैरावैरा पळत होती.. एमआयडीसीत स्फोट झाला तिथून सात ते आठ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात साधारण हेच चित्र होते.

डोंबिवली एमआयडीसी फेज- २ येथील एका कंपनीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण स्फोट झाला आणि या स्फोटाच्या आवाजाने जवळपास संपूर्ण शहर हादरले. या स्फोटात कंपनी बेचिराख झाली असून किमान ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. डोंबिवली आणि लगतच्या भागातील अग्मिशन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

नेमके काय घडले?

एमआयडीसी फेज २ मधील केमिकल कंपनीत दुपारी पावणे दोनच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बॉयलरचा असल्याचे समजते. मात्र, अद्याप सरकारी यंत्रणांनी स्फोट नेमका कशाचा होता, कारण काय हे अद्याप स्पष्ट केले नाही. ज्या कंपनीत आग लागली ती केमिकल कंपनी आहे. तर त्याच्यालगतच ऑक्सिजन सिलिंडरचा प्लान्ट आहे. त्यामुळे ही आग वेगाने पसरली. जखमींना पूर्वेतील दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका जखमीला डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

बघ्यांची गर्दी

स्फोटाची तीव्रता आणि आगीचे लोण पाहता डोंबिवली आणि लगतच्या भागातील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांना कंपनीपर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यातच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी बघ्यांना तेथून हुसकावून लावल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्याचा कामास सोयीस्कर झाले.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. एक ते दीड तासात आग आटोक्यात येईल. आत्तापर्यंत दोन ते तीन मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

- उद्योग मंत्री उदय सामंत

अमूदान या केमिकल कंपनीत स्फोट झाला. या कंपनीत हार्डनर तयार केले जायचे. या स्फोटाचा परिणाम दूरपर्यंत झाला आहे. घटनास्थळ रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.

- श्रीकांत शिंदे

Dombivli MIDC Blast
Dombivli Blast : घरातला बेड गुडघ्यापर्यंत हवेत उडाला... स्फोटाने हादरला दीड किलोमिटरचा परिसर, काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.