जमिनीचा मोबदला  लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडला, पोलीसात तक्रार दाखल
Palghar Crimesakal

Palghar Crime: जमिनीचा मोबदला लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडला, पोलीसात तक्रार दाखल

संबंधित लोकप्रतिनिधीने १० वर्षे भाडेकरारावर दिलेली जमीन १३ वर्षे होऊनदेखील महिलेला परत केली नाही |
Published on

Tarapur News: डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी वृद्धेला मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गामध्ये बाधित जमिनीचा मोबदला मिळाला आहे. मात्र ही लाखोंची रक्कम आशागड येथील लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडल्याची, तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार तिने डहाणू पोलिस ठाण्यात दिली आहे.

जमिनीचा मोबदला  लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडला, पोलीसात तक्रार दाखल
Tara Sutaria : 'अप्सरेसारखीच सुंदर..', अभिनेत्रीच्या 'जलपरी' लूकनं वेधलं लक्ष

डहाणूतील आशागडनजीकच्या रायतळी येथील सुकरी लक्ष्या रावत्या (वय ७५) या महिलेची जागा द्रुतगती महामार्गात बाधित झाली आहे. तिला मिळालेल्या मोबदल्यातून लोकप्रतिनिधीने महिलेची फसवणूक केली. त्याने ८२ लाख रुपये लुबाडल्याची लेखी तक्रार महिलेने डहाणू पोलिस ठाण्यात दिली आहे.

जमिनीचा मोबदला  लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडला, पोलीसात तक्रार दाखल
Nagpur Crime : ३०० कोटींच्या संपत्ती मिळविण्यासाठी एक कोटी देऊन रचला अपघाताचा कट

शिवाय संबंधित लोकप्रतिनिधीने १० वर्षे भाडेकरारावर दिलेली जमीन १३ वर्षे होऊनदेखील महिलेला परत केली नाही. ही जागा मागितल्यावर लोकप्रतिनिधीने तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचेदेखील तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून महिलेची जमीन आणि लुबाडलेले पैसे परत करून देण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

जमिनीचा मोबदला  लोकप्रतिनिधीने फसवणूक करून लुबाडला, पोलीसात तक्रार दाखल
Ahmednagar Crime News : आरोपींवर कठोर कारवाई करा; आरपीआयची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.