मुंबई : मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिस्थितीत तुम्हाला कोणत्या कारणामुळे कोरोना झालाय असं वाटत असेल आणि कोरोना चाचणी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्हाला कॉरोन टेस्ट करायची असल्यास तुमच्या मनात पहिला प्रश्न येईल आपण सरकारी दवाखान्यात टेस्ट करायची का प्रायव्हेट रुग्णालयात. बरं प्रायव्हेट रुग्णालयात टेस्ट करायची असल्यास सरकारी दवाखान्यातून प्रिस्क्रिप्शन आणावं लागतं का ? हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र आता यावर उत्तर आलंय.
एखाद्या व्यक्तीला कोरोना चाचणी करावयाची असल्यास आता तो ती करू शकणार आहे. त्यासाठी सरकारी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आता गरज नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच 'आयसीएमआर'ने कोरोना चाचणीबाबात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात हा बदल सुचवण्यात आला आहे.
'आयसीएमआर'ने यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार कोरोना चाचणीसाठी सरकारी डॉक्टरांच प्रिस्क्रिप्शन अनिवार्य केलं होतं. त्यामुळे प्रिस्क्रिप्शन घेण्यासाठी सरकारी दवाखाने तसेच रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांची गर्दी होत होती. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच डॉक्टरांवर ही ताण येत होता.
'आयसीएमआर'ने सरकारी तसेच खासगी मिळून 1,049 लॅब ला परवानगी दिली आहे. त्यात 761 सरकारी तर 288 खासगी लॅब चा समावेश आहे. महाराष्ट्रात सरकारी तसेच खासगी 103 लॅब असून त्यात 60 सरकारी आणि 43 खासगी लॅबचा समावेश आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण 4610 एवढे आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत.
अनेक खासगी लॅब चांगलं काम करत आहेत. त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे असे ही 'आयसीएमआर'ने म्हटले आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक चाचणी करणे हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे,आपण त्यांना रोखू शकत नाही. रुग्णांनी अधिकाधिक चाचण्या केल्यास त्याच्या आरोग्यासाठी ते महत्वाचे ठरणार असून कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात ही मदत मिळणार असल्याचे 'आयसीएमआर' ने म्हटले आहे.
confused about covid prescription read very important news and guidelines by ICMR
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.