Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून गोंधळ; दुर्घटनेत आतापर्यंत किती कामगारांचा मृत्यू?

स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून पालिका आणि पोलीस प्रशासनात गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blastesakal
Updated on
Summary

एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत (Amudan Company) गुरुवारी दुपारी स्फोट झाला. यामुळे आजूबाजूच्या कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडून आगीत जळून खाक झाल्या आहेत.

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC Blast) अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी झालेल्या स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून पालिका आणि पोलीस प्रशासनात गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पालिका प्रशासन 5 जण जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. तर, रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केल्याप्रमाणे आठ कामगार मृत झाल्याचे स्पष्ट केले होते.

Dombivli MIDC Blast
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधाऱ्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त; डोळ्यात तेल घालून पहारा, काय आहे कारण?

शुक्रवारी सकाळी हा आकडा 11 तर, ठाणे गुन्हे शाखेने (Thane Crime Branch) सायंकाळी 13 चा आकडा प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केला होता. पालिका प्रशासन मात्र त्यावेळी ही 8 जणांचा मृत्यू यावर ठाम होते. शनिवारी सकाळी 13 जणांचा मृत्यू, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असेल तरी अधिकृत आकडेवारीची घोषणा कोणी ही करत नाही. यामुळे मृतांच्या आकडेवारी वरून अजून ही गोंधळ असल्याचे दिसत आहे.

एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत (Amudan Company) गुरुवारी दुपारी स्फोट झाला. यामुळे आजूबाजूच्या कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडून आगीत जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत 60 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर मृत्यू किती याचा अद्याप गोंधळ सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता.

Dombivli MIDC Blast
Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर भररस्त्यात हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आणखी तीन मृतदेह कंपनी आवारात सापडले आहेत. ते तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात येणार आहेत, अशी ऐकीव माहिती घटनास्थळावरील वरिष्ठ नियंत्रक अधिकाऱ्यांना मिळाली. ती माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. त्यामुळे मृतांचा आकडा आठ असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी आवार, परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले विविध अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून पालिका शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. अवशेषांनी भरलेली ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांचा आकडा 13 असल्याचे जाहीर केले. या पाच बोचक्यांमध्ये दोन कामगारांचे अवशेष असण्याची शक्यता वैद्यकीय पथकाकडून वर्तविण्यात आली.

Dombivli MIDC Blast
Ujani Dam : उजनी जलाशयात बोट बुडून 6 जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर प्रशासन उपायोजनासाठी काय भूमिका घेणार?

परंतु, ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच अवशेषांची ही बोचकी म्हणजे पाच मृत कामगार असा अर्थ काढून प्रसिध्दीपत्रक जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी मृतांच्या आकडेवरून गोधळ उडाला. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी शुक्रवारी सकाळी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट दिल्यानंतर तेथे आठ मृतदेह होते. त्याप्रमाणे पालिकेने आठ मृतदेह स्फोटातून बाहेर काढल्याचे स्पष्ट केले आहे. सापडलेल्या विविध अवशेषांची फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर ते अवेशष किती कामगारांचे आहेत, ते स्पष्ट होईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.