मुंबई : केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.
कांदिवलीत आंदोलन सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केल्याचा आरोपही या वेळी काँग्रेसकडून करण्यात आला. यात कार्यकर्त्यांच्या वाहनांचे नुकसान झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
याबाबत बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, भाजपच्या अशा दादागिरीला काँग्रेस भीक घालत नाही. पीयूष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.