"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"

'कॉफी विथ सकाळ'मध्ये यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल
"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"
Updated on

'कॉफी विथ सकाळ'मध्ये यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: "काँग्रेस (Congress) एक विचार आहे. भाजप (BJP) या विचाराला पुसण्याचे काम करत आहे. ते काँग्रेसमुक्त भारत (Congress Free India) करण्याची भाषा करत होते. पण आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र (BJP Free Maharashtra) केला", असा टोला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपला लगावला. 'कॉफी विथ सकाळ' (Coffee with Sakal) कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेतेमंडळींवर तसेच काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली. (Congress Free India not possible but we made BJP free Maharashtra Trolls MVA Minister Yashomati Thakur)

"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"
महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे नवरा बायकोचा संसार!

"आम्ही आणखी चांगले नियोजन केले असते, तर आम्हाला विधानसभेत अधिक जागा मिळाल्या असत्या. राहुल गांधींशी जवळीक असलेले युवा नेते स्वार्थी झाले आणि त्यातील काही त्यांना सोडून गेले. त्याचा काही अंशी फटका काँग्रेसला बसला. आणखी काही लोक स्वार्थापोटी सोडून जात असतील, तर त्याला काय करणार? ज्या लोकांना काँग्रेसमुळे सगळे काही मिळाले, त्यांनी केवळ स्वार्थ दाखवला", अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"
"कोरोनाकाळात कोणीही उपाशी झोपू नये यासाठी आम्ही प्रयत्न केले"

तर भारतात इतका कोरोना वाढला नसता...

"स्वार्थापोटी अनेक लोक सोडून गेले पण आता ते निवडून येऊ शकत नाहीत. त्यांना भाजपामध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते लोक नक्की परत येतील. भाजपने राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी जितका खर्च केला, तितका कोरोनाकाळात केला असता, तर देशात आज अशी भयानक स्थिती निर्माण झाली नसती", अशी खोचक टीका त्यांनी केली.

"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला"
"भाजपने सुचवलेल्या 'या' नावाला शिवसेना विरोध करणार नाही"

महाराष्ट्रालाही लवकरच महिला मुख्यमंत्री मिळेल!

"लोकांनी टाळ्या वाजवल्या, घंटा वाजवली, पण त्यातून कोरोना गेला का? नमस्ते ट्रम्प केले नसते, तर देशात इतके लोक मृत्यूमुखी पडले नसते. या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर या देशात काँग्रेस विचारधारा जिवंत ठेवावी लागेल. आम्हाला राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षासाठी काम करावे लागेल. आमचे विविध प्रयत्न सुरू आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष गावागावात जाऊन पक्षाची भूमिका सांगत आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातही एखादी महिला मुख्यमंत्री होईल", असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()