Baba Siddique : सलमान शाहरुखची भांडणे सोडवणारा नेता का आहे काँग्रेसवर नाराज? स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Baba Siddique : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दिकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
Baba Siddique
Baba SiddiqueEsakal
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दिकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.

मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्यांनी पक्षांतर केलं. त्यानंतर आता काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या त्यावर बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दिकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Baba Siddique
Gyanvapi Masjid : मुलायमसिंह यादव सरकारने ज्ञानवापीतील व्यासजी तळघर का केलं होतं बंद, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

बाबा सिद्दीकी प्रतिक्रिया देताना म्हणाले, "मी असा लपून जाणार नाही. जेव्हा जाईन तेव्हा उघडपणे जाईन, सध्या मी काँग्रेसमध्ये असून, जाईन तेव्हा सर्वांना सांगून जाणार" असं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

तर झिशान सिद्दकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "सध्या माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. मी काँग्रेससोबत आहे. मी स्वत:बद्दल सांगू शकतो वडिलांचं (बाबा सिद्दीकी)तुम्ही त्यांना विचारा, असं आमदार झिशान सिद्दकी यांनी म्हटलं आहे. सिद्दकी पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.

Baba Siddique
Stray Dogs Killed Child : धक्कादायक! वडिलांसोबत झोपडीत झोपलेल्या एक वर्षाच्या बाळावर कुत्र्याचा हल्ला, ओढत नेलं अन्...

पुढे ते म्हणाले की, इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही. मी सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहे. जर काही घडत असेल तर नक्कीच सांगेन. वडिलांबाबत मला माहित नाही. याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, आज सकाळपासून मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्यासंबधीची विचारणा करण्यात येत आहे. काँग्रेस सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असंही झिशान सिद्दकी म्हणाले आहेत.

Baba Siddique
Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या तळघरात पुजेच्या स्थगितीला हायकोर्टाचा नकार; मशीद समितीची याचिका फेटाळली

वांद्रे मतदारसंघात शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. मातोश्री परिसरातील हा मतदारसंघ शिवसेनेचा गड असल्याने त्याला सुरुंग लागल्याने उध्दव ठाकरे यांना हा मोठा धक्का होता. मात्र शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने अपक्ष उभ्या राहिलेल्या तृप्ती सावंत यांनी मोठ्या प्रमाणावर मते आपल्या बाजूने वळवल्यामुळे उध्दव यांच्या हातातील जागा गेली. याचे शल्य अजूनही मातोश्रीला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत जागा खेचून आणायची असा मातोश्रीचा निर्धार आहे. या जागेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत उध्दव यांचे अत्यंत विश्वासू नेते अनिल परब यांना उमेदवारी देण्यात येणार आहे आणि तसे झाल्यास महाविकास आघाडीत असूनही आपल्याला बाजूला जावे लागेल, अशी भीती झिशान यांना आहे.

अशातच झिशान यांच्यावर एसआरएमधील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दुसऱ्या बाजूला वांद्रे नाही तर किमान वर्सोवा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी झिशान प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी महत्वाकांक्षी असून आपल्या मुलाला राजकारणात उभे करण्यासाठी ते आपली सारी ताकद पणाला लावतील. भाजप मध्ये गेल्यास त्यांच्या मागे असलेला मुस्लिम समाज नाराज होईल, या भीतीपोटी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.