"राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे"
मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी महिन्याभरापूर्वी राज्याच्या राजकारणात एक 'लेटरबॉम्ब' (Letter Bomb) टाकत खळबळ माजवली. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या दबावामुळे वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) बारमालकांकडून दरमहा १०० कोटींची (100 crs Case) वसूली करत असल्याचा आरोप परमबीर यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने CBI ला दिल्यानंतर अनिल देशमुख गृहमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर CBI ने गुन्हा दाखल केला. पाठोपाठ मंगळवारी सक्तवसुली संचालनालयानेही (Enforcement Directorate) देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपली तीव्र नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. (Congress Leader Sachin Sawant Angry on Pm Modi Govt over Anil Deshmukh ED Issue)
"माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे", असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
"परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे", अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.