Sanjay Nirupam on Thackeray : महाविकास आघाडीत बिघाडी! लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 Latest News : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत देखील धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
congress leader sanjay nirupam on uddhav Thackeray declared candidate from mumbai north west loksabha election 2024
congress leader sanjay nirupam on uddhav Thackeray declared candidate from mumbai north west loksabha election 2024
Updated on

Lok Sabha Election 2024 Latest News : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत देखील धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम संतापल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आङे. संजय निरुपम म्हणाले की, शिवसेनेने उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे, तर जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. संजय निरुपम म्हणाले की, ८ ते ९ जागा प्रलंबित आहेत आणि त्यापैकी एक जागा ही देखील आहे. हा युती धर्माचे उल्लंघन आहे.

संजय निरुपम एवढ्यावरच थांबले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारावरही त्यांनी अनेक आरोप केले. संजय निरुपम म्हणाले, काँग्रेसची अवहेलना करण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेला उमेदवार कोण? तो खिचडी घोटाळ्याचा घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे.

congress leader sanjay nirupam on uddhav Thackeray declared candidate from mumbai north west loksabha election 2024
TMC Candidate List 2024: लोकसभेसाठी TMC ची यादी जाहीर...क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरचे तिकीट तर नुसरत जहाँचा पत्ता कट

संजय निरुपम म्हणाले, कोविडच्या काळात स्थलांतरित मजुरांना बीएमसीकडून मोफत जेवण देण्यात आले. हा चांगला कार्यक्रम होता, पण गरिबांच्या जेवणातूनही शिवसेनेच्या उमेदवाराने कमिशन खाल्ले असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करणार का? हा माझा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला प्रश्न आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा जागेवरून अमोल किर्तिकर यांचे वडिल गजानन कीर्तिकर सध्या खासदार आहेत. गजानन कीर्तिकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम लोकसभा जागेवरून निवडणूक लढवली होती आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम ायंना २,६०,००० हून अधिक मतानी पराभूत केलं होतं.

congress leader sanjay nirupam on uddhav Thackeray declared candidate from mumbai north west loksabha election 2024
VIDEO: सैफ अली खानचा मुलगा श्वेता तिवारीच्या लेकीला करतोय डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.