Mumbai News : मुंबईत मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचा आज सत्याग्रह

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने सुडबुद्धीने कारवाई केली.
congress leader satyagraha over rahul gandhi mp post fake case politics
congress leader satyagraha over rahul gandhi mp post fake case politicsSakal
Updated on

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने सुडबुद्धीने कारवाई केली. खासदारकी रद्द करुन राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.

congress leader satyagraha over rahul gandhi mp post fake case politics
Congress मध्ये 45 आमदारांचा गट, त्यातील 31 आमदार फुटून बाहेर जातील याची..; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी आज (ता.१२) मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे. आंदोलन सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले,

congress leader satyagraha over rahul gandhi mp post fake case politics
Congress Meet : नाना पटोलेंना डच्चू नाहीच? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद अन् विरोधी पक्षनेतेपद आजच ठरणार

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, विधान परिषद गटनेता सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.