"स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने..."; संजय राऊतांचा टोला

काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव
"स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने..."; संजय राऊतांचा टोला
Updated on

काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव

मुंबई: गेले काही दिवस काँग्रेसकडून (Congress) मुंबई महापालिका (Mumbai BMC Elections) आणि भविष्यातील इतर निवडणुकांसाठी स्वबळाचा (Independent) नारा दिला जातोय. या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसला टोला लगावला. त्यानंतर रविवारी सकाळी मुंबईत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याचा समाचार घेतला. "स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून (Chaos) बाहेर यायला हवं. आम्ही कशाप्रकारची लढाई (Fight) करण्यास कायम तयार असतो. शिवसेना कोणत्याही बळावर लढायला तयार आहे. कोरोनाची लढाईदेखील (Fight against Corona) सरकारने स्वबळावरच लढली आहे", अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसची कानउघाडणी केली. (Congress must sort out internal issue before contesting independently in Elections Trolls Sanjay Raut)

"स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने..."; संजय राऊतांचा टोला
जीवनसाथी निवडण्याबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले...

भाजपच्या नेतेमंडळींकडून सातत्याने शिवसेनेवर आणि सरकारवर टीका केली जाते. त्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, "अंगावर आलं तर शिंगावर घेऊ ही शिकवण शिवसेनेची आहे. कोणी विरोधासाठी विरोध आणि राजकारणासाठी राजकारण केलं, तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. अशा वेळी कोणीही राडेबाजी करू नका नाहीतर लोक जोड्याने मारतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. काहींना सत्ता नसल्याने पोटदुखी झाली आहे. अशा लोकांसाठी पोटात घ्यायचे औषध मुख्यमंत्र्यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणातून दिलंय. सगळ्यांनी ही गोष्ट समजून घ्या."

"स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने..."; संजय राऊतांचा टोला
शिवसेनेला शिंग कुठे आहेत? - नारायण राणे

"आमचे मित्रपक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. कोणी काय करावं हे आम्ही सांगत नाही. कोणतीही गोष्ट असो, आम्हीदेखील स्वबळावर लढायला तयार आहोत. इतके दिवस कोरोनाची लढाई सरकारने स्वबळावर लढली आहे. राज्यात संकट असताना अशा वेळी राजकारण नको असं मला वाटतं. बंगालच्या जनतेने स्वाभिमानाच्या मुद्द्यावर ममता यांना निवडून दिलं आहे. तसंच काहीसं महाराष्ट्रात करण्याची तयारी सुरू करायला हवी", असा सल्ला राऊत यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.