भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्रावरही व्यक्त केली नाराजी
मुंबई: भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी कोरोनाच्या (Coronavirus) संकट काँग्रेसच्या वागणुकीमुळे आपण दुःखी झाल्याचं म्हटलं. 'आपल्याच पक्षाचे काही मुख्यमंत्री (CM) आणि महत्त्वाचे नेते कोरोनाच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल (Mislead) करत आहे. लोकप्रतिनिधी मदत करण्याचं कौतुकास्पद काम करत आहेत. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नकारात्मकेमुळे या लोकांची मेहनत वाया जात आहे', असा आरोप नड्डा यांनी पत्रात केला. या प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली. (Congress Nana Patole slams BJP JP Nadda Modi Govt Ashish Shelar over Sonia Gandhi Letter)
"सध्याची देशातील कोरोना स्थिती गंभीर आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली, त्यात सर्वोच्च न्यायालय हे कोरोना संदर्भात सर्वस्वी नाही, असे सांगण्यात आले. ही बाब दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालय हा संविधनाचा आत्मा आहे. त्यामुळे असं म्हणणं योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी कुठल्या आधारे केली, ते कोणालाच माहिती नाही. संविधान संपवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. कोविड संदर्भात होणारे निर्णय हे राष्ट्रीय धोरणात व्हायला पाहिजेत. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ज्या पद्धतीने सोनिया व राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे, ते पाहता हे योग्य घडलेलं नाही", असं पटोले म्हणाले.
आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल
सामनामध्ये सोनियांचा संदेश नावाने एक वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली होती. त्या टीकेचा पटोले यांनी समाचार घेतला. "आशिष शेलार यांनी कोणाबद्दलही कोणतेच आरोप करू नयेत. आज लोकांचे जीव जात आहेत आणि मोदी यांनी केंद्र-राज्य असा दुजाभाव करत आहे. राष्ट्रीय लसीकरणासाठी लोकांना रांगेत उभे रहायला लागू नये, अशी आमची अपेक्षा आहे. शेलार जे बोलले ते हास्यास्पद आहे. जाती पातीबाबत कोण काय बोलतं, ही आजची वेळ नाही. आज बाहेरील देश आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर टीका करत आहेत, तेदेखील काँग्रेसला मान्य नाही", असं पटोले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.