मुंबई : काँग्रेसचं चाललंय काय? पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

Congress
Congressesakal
Updated on
Summary

महिन्याभरापूर्वी जनजागरण पदयात्रेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमदार झिशान सिद्धिकी यांच्यात खटके उडाल्याचे समोर आले होते.

काँग्रेसमध्ये (Congress) पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याची अनेक उदाहरणे याआधी समोर आली आहेत. आता चर्चा आहे ती मुंबईतील (Mumbai) पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या फ्री स्टाइल हाणामारीची. यामुळे काँग्रेसमध्ये नक्की चाललंय काय? असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या केबिनबाहेरच पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली होती. ही घटना ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. पक्षाची पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान घडली. त्यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप त्यावेळी कार्यालयात नव्हते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, व्हाँट्स अँपवरील कमेंट मुळे राग अनावर झालेले तीन पदाधिकारी युवक काँग्रेसच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षला शिवीगाळ करत, अंगावर धावून गेले. यावेळी तीन ही पदाधिकाऱ्यांनी तक्रारदाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी काँग्रेस पदाधिकार्याने दिलेल्या तक्रारीवरून १३ डिसेंबर रोजी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तीनही पदाधिकार्यांवर अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९-३(१)(आर),३(१)एस, अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Congress
''बलात्काराची मजा घ्या'', आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यानं मागितली माफी

याप्रकरणी आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेवरून काँग्रेसमध्ये अशा प्रकारे वाद झाल्याची ही काही पहिली घटना नाही. महिन्याभरापूर्वी जनजागरण पदयात्रेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमदार झिशान सिद्धिकी यांच्यात खटके उडाल्याचे समोर आले होते. त्यावेळी सिद्दीकी यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील हा गृहकलह काँग्रेसला नक्कीच महागात पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.