Zeeshan Siddique: फुटलेल्या मतांचा रोख झिशान सिद्धिकी यांच्यावर? काँग्रेसच्या whatsapp ग्रुपमधून गच्छंती!

Zeeshan Siddique news in marathi: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. काँग्रेसचे ३७ आमदार या बैठकीला हजर राहणे अपेक्षित होते, पण झिशान सिद्दीकी, जितेश अंतापुरकर आणि संजय जगताप हे तीन आमदार अनुपस्थित राहिले.
Zeeshan Siddique
Zeeshan Siddiqueesakal
Updated on

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान पार पडले. यावेळी २७४ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून शेकापचे उमेदवार जयंत पाटील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक, ठाकरे गटाचा एक, शिंदे गटाचे दोन आणि भाजपचे चार उमेदवार हमखास निवडून येतील असे मानले जात होते. मात्र काँग्रेसची आठ मते फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेसची बैठक आणि अनुपस्थितीचे परिणाम-

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. काँग्रेसचे ३७ आमदार या बैठकीला हजर राहणे अपेक्षित होते, पण झिशान सिद्दीकी, जितेश अंतापुरकर आणि संजय जगताप हे तीन आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे क्रॉस वोटिंगच्या अटकळांना उधाण आले होते.

मतांची फाटाफूट टाळण्यासाठी खबरदारी-

मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. काँग्रेसकडून देखील विशेष खबरदारी घेतली जात असताना, झिशान सिद्दीकी यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या नावावर मतांची फाटाफूट केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झिशान सिद्दीकीचे आरोप-

झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, "काँग्रेसने मला सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढले आहे. काँग्रेसमध्ये जी नाराजी आहे ती खूप गंभीर आहे. मला मुद्दाम टार्गेट केले. काँग्रेसची मते फुटली तर त्यावर काँग्रेसने चिंतन करायला हवे. नाराजी तर मोठ्या प्रमाणात होती, पण असे व्हायला नको होते. मला मुद्दाम टार्गेट केले कारण सगळ्यात लहान मी आहे."

Zeeshan Siddique
Sakal Survey 2024: स्वबळावर की एकला चलो रे? सर्वेक्षणातून महाराष्ट्राच्या जनतेचा भाजपासाठी 'मेसेज'

पुढील विधानसभा निवडणुकीचे संकेत-

झिशान सिद्दीकी यांनी पुढे सांगितले की, "मी आगामी विधानसभा निवडणूक लढणार आणि कोणत्या पक्षातून लढणार हे आता सांगणार नाही."

बाबा सिद्दीकी यांची प्रतिक्रिया-

बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, "काँग्रेसने जे केले ते खूप चुकीचे आहे. ज्या समाजाच्या जीवावर निवडून येतात त्यांना विसरतात. अनेक वर्षे वरच्या सभागृहात मुस्लिम उमेदवार नाही. झिशानला बैठकीला बोलावले नाही. अनेक उदाहरणे आहेत ज्यात वडील आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षात आहेत. तरी त्याला टार्गेट केले. झिशान मोठा आणि समंजस आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतो."

झिशान सिद्दीकी यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.

Zeeshan Siddique
MLC Election results 2024 : जयंत पाटील पराभूत! विधानपरिषदेचा निकाल जाहीर, मविआला मोठा धक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.