BMC निवडणुकीआधी काँग्रेसची कोर्टात धाव; ५००० कोटी प्रकरणात सेनेला नडणार

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणीचे आदेश मुंबई महापालिकेला द्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
bmc election
bmc election sakal
Updated on

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेलं काँग्रेस आपल्या मित्रपक्षांशी नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसतच होतं. मात्र आता काँग्रेसची शिवसेनेबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसने शिवसेनेवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. याबद्दल मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. (Mumbai congress approached to supreme court against BMC and Shivsena)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ६ STP प्रकल्पांविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. BMC द्वारे प्रदान केलेल्या ६ STP प्रकल्पांच्या अंदाजांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेला एक नवीन पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि फक्त 2 वर्षात 5000 कोटींची वाढ झाली आहे त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.

तसंच या प्रकल्पांचं पुनरावलोकन होईपर्यंत त्यांनी महापालिकेला निविदा प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील मुंबई काँग्रेसने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.