'महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले, ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला.'
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे (Andheri East Assembly Constituency) शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या आकस्मिक निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असेलली काँग्रेस मात्र उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी धावून आली असून काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे.
पटोले म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचं सरकार होतं. या सरकारनं शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केलं. पण, सत्तापिपासू भाजनं ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडलं.'
महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले, ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील,' असं पटोलेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 14 ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.