Palghar Assembly Election : पालघर मध्ये काँग्रेसचा 4 जगाचा आग्रह; महाविकास आघाडीत जागा वाटपात तिढा निर्माण होणार

पालघर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचा मोठा बोलबाला असताना काँग्रेस पक्षाने पालघर मधील ६ पैकी ४ जागा मिळाव्यात असा दावा केल्याने आधीच्या जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची श्यक्यता राजकीय निरीक्षक बोलून दाखवत आहेत.
congress urges 4 seat in Palghar Mahavikas Aghadi allotment of seats dispute possible assembly election 2024
congress urges 4 seat in Palghar Mahavikas Aghadi allotment of seats dispute possible assembly election 2024Sakal
Updated on

विरार : लोकसभेच्या निवडणुकीत पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या भारती कामडी (शिवसेना उद्धव ठाकरे)यांनी भाजपला चांगली लढत देऊन जवळपास साडेचार लाखाच्यावर मते घेतल्याने महाविकास आघाडीत विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे.

पालघर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचा मोठा बोलबाला असताना काँग्रेस पक्षाने पालघर मधील ६ पैकी ४ जागा मिळाव्यात असा दावा केल्याने आधीच्या जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची श्यक्यता राजकीय निरीक्षक बोलून दाखवत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे अवघे २ आमदार असताना आघाडीच्या भारती कामडी यांनी भाजपला चांगलीच लढत तर दिलीच पण त्याच वेळी बहुजन विकास आघाडीलाही धक्का दिल्याने महाविकास आघाडीचा विश्वास दुणावला असल्याच्या पार्श्वभूमीवर आता विधान सभेची रणनीती आखण्यास सुरुवात झाली असतानाच काँग्रेच्या किसान काँग्रेसचे परदेसशाध्यक्ष पराग पष्टे यांनी पालघरमधील विक्रमगड,

congress urges 4 seat in Palghar Mahavikas Aghadi allotment of seats dispute possible assembly election 2024
Dombivli Crime : मला ओळखले का? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा... भामट्याने तब्बल 50हून अधिक जणांना घातला गंडा

पालघर, बोईसर आणि वसई या जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी केल्याने महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालघर, वसई, बोईसर या मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे तर त्या तुलनेत काँग्रेसची ताकद मात्र कमी असताना काँग्रेस तर्फे अशी मागणी केल्याने आस्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसने ४ जगाची मागणी केली असतानाच दुसऱ्या बाजूला राहिलेल्या २ जागापैकी एक जागा मार्क्सवादी आणि १ जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडण्यात येणार असून शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही स एक अर्थे याठिकाणी राजकीय निरीक्षक खात आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळाल्याने सद्या ते राज्यात महाविकास आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने आघाडीत ते इतरांना न विचारता आपल्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपा वरून बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.