प्रताप सरनाईक यांच्यासह चारजणांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह चार जणांना दिलासा
mumbai
mumbai sakal
Updated on

मुंबई : ‘मनी लॉन्ड्रिंग’ (Money laundering) प्रकरणात चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे (Shivsena) आमदार(MLA) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासह चार जणांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेला दिलासा २३ ऑगस्टपर्यंत (August) बुधवारी वाढविण्यात आला. चौघांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने (Court) सक्तवसुली संचालनालयाला दिले.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. या विरोधात सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश, तसेच योगेश चांदेगा यांनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी होऊ शकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने ‘ईडी’ला दिले.

mumbai
नगरसेवकांची मज्जा; ‘स’ यादीतील कामे मार्गी लागणार

याआधी टॉप्स सुरक्षारक्षक प्रकरणात सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ‘ईडी’ ने एनएसईएल प्रकरणात योगेश देशमुख याला अटक केली आहे. देशमुख सरनाईक यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. सुमारे ५,५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात काही व्यवहार देशमुख यांच्याकडून झाल्याचा दावा ‘ईडी’कडून केला जात आहे. सरनाईक यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.