हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा करण्यात आला सत्कार
मुंबई: कर्तव्यावर असताना बांबूने (Bamboo Attack) हल्ला करत हत्या करण्यात आलेल्या पोलीस हवालदार विलास शिंदे प्रकरणातील (Constable Vilas Shinde murder Case) मुख्य हल्लेखोरावरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर यातील दुसरा अल्पवयीन आरोपीवरदेखील खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. यातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे (Rajendra Kane) यांचा सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी सृतिचिन्ह देऊन सत्कार केला. (Constable Vilas Shinde murder Case Accused sentenced to life imprisonment)
अहमद अली मोहम्मद अली (28) असे या मुख्य आरोपीचे नाव आहे. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस व्ही रोड, खार (प.) येथील मॅक्लॉइड पेट्रोल पंप परिसरात 23 ऑगस्ट, 2016 रोजी अहमद अली याचा लहान अल्पवयीन भाऊ हेल्मेट न घालताच मोटारसायकल चालवत होता. कर्तव्यावर असलेल्या विलास शिंदे यांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्याच्याकडे कागदपत्रे नव्हते. त्यामुळे दुचाकी तिथेच सोडून त्याला पालकांना बोलावण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या मागे बसलेला त्याचा मोठा भाऊ अहमद अली याने शिंदेसोबत हुज्जत घालत त्यांच्यावर बांबूने त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा 31ऑगस्ट, 2016 रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे पेट्रोल पंप तुटल्याने इतरत्र तसेच उत्तर प्रदेश येथे निघून गेले होते. तपास अधिकारी पोनि. राजेंद्र काणे यांनी त्या साक्षीदारांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सर्व साक्षी पुराव्याअंती न्यायालयाने आरोपी अहमद अली याला आजन्म कारावास व 59 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यातील रोख दंडाच्या रकमेपैकी 45 हजार रुपये शाहिद पोलीस हवालदार शिंदे यांच्या पत्नी यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील बालअपचारी हा अल्पवयीन असून त्याचा गुन्हा जघण्य गुन्हा ठरवून त्याच्या विरुद्ध खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.
दिल्लीतील निर्भया बलात्कारानंतरचा मुंबईतील हा पहिला खटला ठरला आहे. बालअपचारीच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याची सुनावणी प्रलंबित आहे. या खटल्याचे विशेष अभियोक्ता वैभव बगाडे यांनी कामकाज पाहिले. तसेच सह फोजदार किन्हाळकर मॅडम व पोलीस शिपाई राहुल पवार यांनी सहकार्य केले. या खटल्याचे तपासी अधिकारी राजेंद्र काणे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलीस हवालदार विलास विठोबा शिंदे यांना शाहिद घोषित करण्यात आले व त्यांच्या मुलाला पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काणे यांच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांनी केलेल्या प्रशंसनीय व कामगिरीबद्दल सोमवारी राजेंद्र काणे यांना सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशस्तीपत्र वस्मृति चिन्ह देऊन गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.