मंबई : मुंबईतील एका रेस्टॉरंट मालकाला त्यांनीच विकलेल्या विकलेल्या आईसक्रीमने चांगलाच चटका लावलाय. मुंबईतील मुंबई सेंट्रल भागातील शगुन व्हेज नावाच्या रेस्टॉरंटने एका फॅमिली पॅक आईस्क्रिमसाठी अधिकतम विक्री मूल्यापेक्षा म्हणजेच MRP पेक्षा १० रुपये अधिक किमतीने पाच वर्षांपूर्वी आईस्क्रीम विकलं होतं. त्यामुळे आता या रेस्टॉरंट मालकाला तब्बल दोन लाखांचा दंड आणि पंधरा हजारांची नुकसान भरपाई द्यावी लागलीये.
घटना तब्बल पाच वर्षांपूर्वीची आहे. मुंबई पोलिसांमध्ये त्यावेळी PSI पदावर कार्यरत असेलले भास्कर जाधव यांची त्या दिवसाची ड्युटी संपली. ड्युटी संपवून ते आपल्या घरी जात होते. घरी जाताना भास्कर जाधव यांना त्यांच्या मुलीचा फोन आला. "माझ्या मुलीने तिला आईस्क्रीम खायचय असं मला सांगितलं. म्हणून मी शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये आईसक्रिमच्या फॅमिली पॅकची विचारणा केली. त्यावर एकावर एक फ्री अशी ऑफर होती. त्यावेळी हॉटेल मॅनेजरने मला ७०० मिलीचा आईसक्रिमचा पॅक दिला आणि माझ्याकडून १७५ रुपये घेतले. या आईस्क्रीमची एक्स्पायरी डेट तपासताना मला त्या पॅकची १६५ रुपये अशी छापील MRP दिसली. किंमत पाहून मी त्या हॉटेल चालकाला माझे दहा रुपये परत मागितले. मात्र कुलिंग चार्जेसच्या नावाखाली त्या हॉटेल चालकाने माझे दहा रुपये देण्यास नकार दिला."
जाधव यांना त्यांच्या ग्राहक हक्काची चांगली माहिती होती. जाधव यांनी पुन्हा हॉटेल चालकाकडे त्यांचे दहा रुपये मागितले. मात्र त्यांना त्यांचे दहा रुपये देण्यास नकार देण्यात आला. यावर त्यांना एकदा विकलेला माळ परत घेतला जाणार नाही असंही सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांनी हॉटेल चालकांकडून बिल मागितलं. या हॉटेल चालकाने त्यांना १७५ रुपयांचा कॅश मेमो दिला. यानंतर मी कार्यकर्ते प्रकाश शेठ यांच्या मदतीने दक्षिण मुंबईतील जिल्हा आयुक्त तक्रार निवारण मंचाकडे संपर्क साधला आणि पाच वर्षांनंतर आता या मंचाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे.
ग्राहक न्यायालयाने आपल्या ऑर्डरमध्ये शगुन व्हेज रेस्टॉरंला MRP पेक्षा अधिक किमतीत विक्री करू नये असं स्पष्ट म्हणटलंय. सोबतच कोर्टाने जाधव यांचे दहा रुपयेही परत देण्यास सांगितलं आहे. भास्कर जाधव हे सध्या वडाळा IT पोलिस स्टेशनमध्ये असिस्टंट सब इंस्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान कोर्टाने सुनावलेला दोन लाखांचा दंड शगुन हॉटेलला ४५ दिवसांच्या आतमध्ये भरावा लागणार आहे. हा निधी ग्राहक कल्याण निधीकडे दिला जाणार आहे.
"कोर्टाने दिलेल्या निकालावर मी खूष असल्याचं भास्कर जाधव म्हणालेत. रेस्टॉरंटला दहा रुपयांसाठी भारी दंड भरावा लागेल. ग्राहक न्यायालयात जाण्याचा माझा हेतू इतकाच होता की, मला माझ्या हक्कांसाठी लढा द्यायचा आहे आणि ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करायची. मला आशा आहे की रेस्टॉरंटमध्ये आता जादा शुल्क आकारणे आता थांबेल.
consumer court slapped restaurant with two lakh fine for taking ten rupees extra from costumer
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.