उरण : सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीद्वारे जेएनपीटी वसाहतीत होत असलेला पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून दूषित आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान याबाबत तक्रार करूनही गेल्या ६ दिवसांपासून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर दूषित पाणी बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जेएनपीटी बंदरातील कामगारांची आणि अधिकाऱ्यांची वसाहत
हे पण वाचा : एसटीवर दिवाळखोरीचे सावट
देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेल्या जेएनपीटी बंदरातील कामगारांची आणि अधिकाऱ्यांची ही वसाहत आहे. या वसाहतीला दररोज ५ एमएलडी पाण्याची गरज असताना रोज फक्त १ ते १.५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र तो अपुरा असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच वणवण करावे लागते.
हे पण वाचा : या परिसरात घर घेतना विचार करा!
सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने येथील नागरिकांना पाणी समस्यांचा सामना करावा लागला. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी चिमाजी दलाल यांनी सध्या वॉशआऊट काढल्यामुळे पाणी चांगले येत असल्याचे सांगितले.
Contaminated water in the labor colony of uran serious health issue may arise
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.