Pravin Darekar
Pravin DarekarSakal

Contract Recruitment : कंत्राटी नोकरभरती हे आघाडी सरकारचे पाप!

कंत्राटी नोकरभरतीवरून भाजपतर्फे आज गिरगाव येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
Published on

मुंबई - कंत्राटी नोकरभरती हे महाविकास आघाडी सरकारचे पाप असून त्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जनसामान्यांची व बेरोजगार तरुणांची दिशाभूल केली, असा आरोप विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला. भाजपतर्फे आयोजित जनआक्रोश आंदोलनात ते बोलत होते.

कंत्राटी नोकरभरतीवरून भाजपतर्फे आज गिरगाव येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक अतुल शहा, भाजप मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय आदी हजर होते. कार्यकर्त्यांनी फलकांची होळी केली.

कंत्राटी नोकर भरती हे काँग्रेस, तसेच महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी व काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीतील जीआर दाखवून दिले. त्यामुळे महाविकास आघाडी तोंडावर आपटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंत्राटी नोकरभरतीचे पाप झाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच हे पाप करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांना भडकावण्याचे काम महाविकास आघाडी करत होती. त्यामुळे या सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, यासाठी आंदोलन छेडले, असेही दरेकर या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.