Meghana Bordikar: BJP MLA  मेघना बोर्डीकरांच्या पैशाच्या फोल्डरवरून वादंग, नेमकं काय घडलं? आमदारांनं स्वत: सांगितलं कारण

Meghana Bordikar News: विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील कामकाज सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर येत असते. सध्या सोशल मीडियावर भाजप आमदारांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
Meghana Bordikar
Meghana Bordikaresakal
Updated on

विधानसभेचं कामकाज सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर या एका फोल्डरमध्ये पैशाच्या नोटा टाकून कर्मचाऱ्याला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर बोर्डीकर यांनी 'एक्स' पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला आहे.

महादेव बालगुडे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांनी बोर्डीकर यांचा विधानसभेतील व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "व्हिडिओ बारकाईने बघा. जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे." या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी बोर्डीकर यांच्या क्रियाकलापावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मेघना बोर्डीकर यांचा खुलासा-

मेघना बोर्डीकर यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये सांगितले की, "सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले." त्यांनी सांगितले की, "नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत."

Meghana Bordikar
Ganpat Gaikwad: देशमुख अन् मलिकांना नाही तर गणपत गायकवाडांना कशी मिळाली मतदानाची परवानगी? न्यायाच्या समानतेचा मुद्दा पुन्हा उपस्थित

व्हिडिओमुळे विधानसभेत चर्चा-

विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील कामकाज सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर येत असते. सध्या सोशल मीडियावर भाजप आमदारांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आमदार राजेश पवार सभागृहामध्ये आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी मागे भाजप आमदार मेघना बोर्डीकर या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. विधीमंडळामध्ये फाईलमध्ये असे पैसे ठेवल्याने चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांना बोर्डीकर यांची विनंती-

"हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी विनंती आहे की किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे," असे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

Meghana Bordikar
Samvidhaan Hatya Diwas: 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित, केंद्र सरकारची मोठी घोषणा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.