मुंबई : सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही, असा आरोप करत याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा यांनी केली आहे. (Coordinator of Maratha Kranti Morcha and students aggitating in Mantralay Mumbai)
मराठा समाजाच्या एकूण १४ मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात उपोषण पुकारलं होतं. या मागण्या मान्य करण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन देत सरकारनं त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडलं. त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतरही अद्याप या मागण्या मान्य होऊनही त्याची दिलेल्या वेळेत पूर्तता झालेली नाही.
यामध्ये सारथीमधील रिक्त पदं, सारथीची आठ उपकेंद्रांसाठी जमीन देणार, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना एसटीत नोकरी तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांनासाठी वसतीगृहांचं गुढी पाडव्याला उद्घाटन होणार होतं पण अद्याप या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वय विद्यार्थी मंत्रालयात आले होते. पण संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं हे आंदोलक अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
दरम्यान, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे ते अंकुश कदम म्हणाले, सरकारचे काही जातीयवादी अधिकारी मराठा समाजाचा घात करण्याच काम जाणीवपूर्वक करत आहेत. आज गरज नसताना या अधिकाऱ्यांनी तोंडी मत मागवलं असून हे अधिकारी आमच्या मागण्या धुडकावत आहेत. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर ते आत्महत्या करण्यास हे अधिकारी भाग पाडत आहेत. झुकेंगा नही म्हणणाऱ्या म्हातारीला भेटायसाठी मुख्यंमत्र्यांना वेळ असतो पण आमचे विद्यार्थी मेल्यानंतर मुख्यमंत्री येणार आहेत का? जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटायला येत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.