मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2 हजार 686 कर्मचाऱ्यांना कोव्हिडची बाधा झाली असून आतापर्यंत 108 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यांपासून त्यांच्या कुटूंबियांनाही कोव्हिडची लागण होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे.
उपायुक्त शिरीष दिक्षीत, सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, तसेच एका विभागप्रमुखाचा कोव्हिडने बळी घेतला आहे. तसेच, घनकचरा विभागातील सर्वाधिक 31 आणि आरोग्य विभागातील 27 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय अग्निशमन दलातील 8, सुरक्षा विभागातील 7 झोन एकमधील 5, झोन दोनच्या 4 आणि इतर विभागातील 21 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख आणि अनुकंपतत्त्वावर नोकरी दिली जाणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वी जाहिर केलेे आहे.
10 जूलैपर्यंत 2198 कर्मचाऱ्यांना कोव्हिडची लागण झाली होती. तर, 102 जणांचा मृत्यू झाला होता. 10 दिवसांत साधारणत: 600 जण नव्याने बाधित झाले. तर, 1000 ते 1200 कर्मचाऱ्यांनी कोव्हिडवर मात केली आहे, अशी माहिती पालिका कर्मचारी संघटनांनी दिली असून पालिका प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
कुटुंबीयांनाही लागण
कर्मचाऱ्यांपासून त्यांच्या कुटूंबियांनाही कोव्हिडचा संसर्ग होत आहे. एका विभाग प्रमुखापासून त्यांची पत्नी आणि घरातील इतर सदस्यांनाही कोव्हिडची लागण झाली होती. तर, महापालिका मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना कोव्हिडची लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनाही बाधा झाली आहे.
प्रवासात लागण
सुरवातीला कोव्हिड ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कोव्हिडची बाधा होत होती. मात्र, आता कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बाधा होत आहे. ही बाधा प्रामुख्याने प्रवासात होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(संपादन : वैभव गाटे)
corona affected thousands of employees of the bmc and their families
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.