...अन्यथा दरमहा 15 हजार रुपये भत्ता द्या, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

सरकारने नोकरदार वर्गाचा ईएमआय बंद करावा
Mumbai Local Train
Mumbai Local Trainsakal media
Updated on

मुंबई : कोरोना आणि लाॅकडाऊन (corona and lockdown) काळात लोकल प्रवास बंदी (train traveling) असल्याने ​खासगी कंपनीतील नोकरदार वर्गाला (private employee) मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर, आता ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांना कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचणे कठिण झाले आहे. त्यामुळे, सरकार, प्रशासनाने (state government) लोकल सुरू करणे अपेक्षित आहे. अन्यथा खासगी नोकरदारांचे ईएमआय (EMI) बंद करावा आणि दरमहा 15 हजार रुपये भत्ता द्या, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने (railway travelers union) केली आहे. (corona and lockdown-private employee-train traveling-private employee-state government-EMI-nss91)

उपनगरीय लोकलचे अनन्य साधारण महत्त्व आहे. लोकलचा प्रवास प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे लोकलही मुंबईकरांची जीवनवाहिन आहे. मात्र, दीड वर्षापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल पूर्ण वेळ सुरूच झाली नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये फक्त ठराविक वेळेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. परिणामी, खासगी नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. कामावर न गेल्याने हातात पगार येत नाही. या आर्थिक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला उपासमारीची वेळ आली आहे. अनेक महिन्यांपासून लोकल प्रवासाची मागणी केली तरी लोकल सुरू होत नाही.

Mumbai Local Train
मुंबईतील 87 टक्के बेड्स रिक्त, 50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स रिकामे

राज्यसरकारने किमान कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी. अन्यथा सरकारने खासगी नोकरदार वर्गाचे ईएमआय बंद करावेत. तर, पर्यायी वाहनाने कामाला जाणाऱ्या प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यात 15 हजार रुपये टाकावेत. त्यानंतर पुढील काही वर्षे नोकरदार वर्ग घरीच बसायला तयार आहे, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. राज्य सरकाराने कामगारांच्या मागणीचा सहानुपूतीपूर्वक विचार करावा व योग्य ते सहकार्य केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना लोकल सुरू करा, अन्यथा दरमहा 15 हजार रुपये भत्ता द्या, या मागणीचे निवेदन दिले आहे, अशी मागणी संघटनेचे सचिव यशवंत जड्यार यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()