बालकांच्या लसीकरणाचा मार्ग होणार सुकर ? 'या' कंपनीची लस प्रतीक्षेत

child vaccination.
child vaccination.sakal media
Updated on

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) फटका लहान मुलांना (children) बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाची (corona vaccination test) चाचणीला वेग वाढवण्यात आला असून या महिन्यात या चाचण्यांचा निकाल (result) येण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिला कंपनीची लस मंजुरीच्या (zydus cadila) प्रतीक्षेत असून त्यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईसह देशभरातील विविध रुग्णालयांत चाचण्या सुरू आहेत. त्यातील झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी मिळणार आहे. लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी ही पहिली लस ठरू शकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झायडस कॅडीला लसीच्या आपत्कालीन वापराला याच आठवड्यात परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

child vaccination.
तिहारमधून पॅरोल मिळालेले सुमारे ३,००० आरोपी बेपत्ता - हायकोर्ट

झायडस कॅडीला ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठीदेखील प्रभावी असून पुढील दोन ते तीन आठवड्यांत ती या वयोगटासाठी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी पहिली लस ठरू शकणार आहे. तर 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ती भारतातील सहावी लस असेल.

आतापर्यंत भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक - व्ही या लसींना मान्यता मिळालेली आहे. तर मॉर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींनाही मंजुरी मिळाली आहे. सरकारनं डिसेंबर 2021 पर्यंत सर्व लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावत असल्याचं चित्र आहे. अनेक भागात 18 ते 45 वयोगटासाठीची लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.