मुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही

मुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही
Updated on


मुंबई : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन आतोनात प्रयत्न करतेय. मात्र सहा महिन्यानंतर ही मुंबईतील 33 लाखाहून अधिक नागरिक कंटेन्मेंट झोन मध्ये आहे. त्यामुळे मुंबईतील चिंता कायम असल्याचे दिसते.

मुंबईत 611 एँक्टीव्ह केंटेन्मेंट झोन आहेत. त्यात 7 लाख 8 हजाराहून अधिक घरांचा समावेश आहे. तर 33 लाख 9 हजाराहून अधिक लोकं सध्या कंटेन्मेंट झोन मध्ये आहेत. गेल्या सहा महिन्यात आतापर्यंत 1,048 कंटेंन्मेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत.

कंटेंन्मेंट झोन मधील 9,865 इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यात 2 लाख 9 हजार इमारतींचा समावेश आहे. तर 11 लाख 5 हजार लोकं वास्तव्यास आहेत. आतापर्यंत 25,948 इमारती ह्या केंटेंन्मेंट झोन मधून वगळण्यात आल्या आहेत. 
मुंबईतील 24 विभागांपैकी आर मध्य आणि आर दक्षिण विभागात हजाराहून अधिक इमारती सील कऱण्यात आल्या आहेत. आर मध्य मध्ये 1,335 तर आर दक्षिण मध्ये 1,010 इमारती सील कऱण्यात आल्या आहेत. तर 6 विभागात प्रत्येकी 500 हून अधिक इमारती  सील करण्यात आल्या आहेत.  ई विभागात    सर्वाधिक कमी म्हणजे 37 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 

मुंबईत आतापर्यंत एकूण 1,84,313 बाधित झाले असून 27,664 एँक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यात 18375 लक्षणं विरहीत रूग्ण असून 7966 रूग्णांना लक्षणे जाणवत आहेत. तर 1323 रूग्ण गंभीर आहेत. आतापर्यंत 147807 रूग्णांना घरी सोडण्यात आले असून 8466 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 5 टक्के इतका आहे. 

मुंबईतील दैनंदीन चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय मृत्यूदरावर विशेष लक्ष देण्यात आलं असून मृत्यूदर कमी कऱण्यावर भर देण्यात येत आहे. गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी खासगी रूग्णालयांतील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ही घेण्यात येत आहे.
आय एस चहल ,
आयुक्त , महापालिका

सील इमारती - 9865
घरांची संख्या - 2,09,000
लोकसंख्या - 11,05,000
शिथिल इमारती - 25,948

एकूण रूग्णसंख्या - 1,84,313
एँक्टीव्ह रूग्ण - 27,664
लक्षणे विरहीत रूग्ण - 18,375
लक्षणे असलेले रूग्ण - 7,966
गंभीर रूग्ण - 1,323 
बरे झालेले रूग्ण - 1,47,807
मृत्यू - 8466

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.