मुंबई : कोरोनाच्या (corona) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पाश्वर्भूमीवर बेड कमी (corona beds) पडू नयेत यासाठी पश्चिम उपनगरातील (western mumbai) रुग्णांसाठी मोठी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने पालिकेने (bmc) कांदिवली पूर्व (kandivali) येथील कामगार रुग्णालयात पालिका 63 आयसीयू बेड (icu beds) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या आर/दक्षिण कांदिवली पूर्व येथे राज्य सरकारचे ईएसआयएस हे 300 खाटांचे रुग्णालय आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढला असताना पालिका आयुक्तांच्या मंजुरीने या ठिकाणी जून 2020 पासून कोराेनाचा वॉर्ड सुरू केला होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने ऑगस्ट 2020 पासून हा कोविड वॉर्ड बंद करण्यात आला.
मात्र सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात आलेला असला तरी आरोग्य तज्ञांकडून देण्यात आलेला तिसऱ्या लाटेचा धोका आणि कोविडच्या नव्या स्ट्रेनच्या वेगाने पसरण्याच्या इशाऱ्यामुळे पालिका आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवत आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात पालिका 63 आयसीयू बेड सुरू करणार आहे. या कामासाठी पालिका सुमारे सात कोटींचा खर्च करणार आहे.
पश्चिम उपनगरात मालाड ते दहिसर परिसरातील रुग्णांसाठी पालिकेचे कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय आणि बोरिवलीतील भगवती ही दोन मोठी उपनगरीय रुग्णालये आहेत. कोरोना काळात या रुग्णालयांवर मोठा ताण आल्याने दहिसरमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. मात्र दुसऱ्या लाटेच्या कहरात संपूर्ण मुंबईत दहापेक्षा कमी आयसीयू शिल्लक राहिल्याची आणि आयसीयू मिळणे कठीण बनल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.