CORONA DEATH : शरीराच्या 'या' अवयवांवर घातक परिणाम, जाणून घ्या सविस्तर

तीन वैद्यकीय विभागांचा अभ्यासात सहभाग
CORONA
CORONAsakal media
Updated on

मुंबई : कोविड आजाराने (Corona deaths) मृत्यू झालेल्या मृत्यूच्या कारणांचा विश्लेषणात्मक अभ्यास (Death Study) जे जे रुग्णालय समूहातील डॉक्टरांनी (J J hospital) केला आहे. यात तीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टर (Doctor) सहभागी झाले होते. आतापर्यंत कोरोना विषाणू (Corona Virus) सर्वाधिक फुफ्फुसाला बाधित करून मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे समजत होते. मात्र या अभ्यासातून कोरोना विषाणू फुफ्फुसा व्यतिरिक्त (Lung infection) इतर अंतर्गत अवयवांर देखील परिणाम करत असल्याचे समोर आले. त्यातून कोविड मृत्यूंची (Corona Deaths) कारणे समोर आली आहेत. ( Corona Death Study by J J hospital Doctors corona damages lungs as well as other organs in body-nss91)

यावर बोलत असताना या अभ्यासात सहभागी झालेले जेजे रुग्णालयाचे जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भांडारवर यांनी सांगितले की, भारतीय लोकसंख्येत कोरोना मृत्यूंची कारणे शोधणे महत्वाचे होते. यातून गेल्यावर्षी पासून कोरोना अंतर्गत अवयवांवर काय परिणाम करत असल्याचे संशोधन करण्याचे काम केले गेले. ही कारणे शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्या ऐवजी ऍटॉप्सि पद्धतीचा अवलंब केला गेला. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना संसर्गित मृतदेहाचे शवविच्छेदन न करण्याची  कडक सूचना आहे. त्यामुळे ऍटॉप्सी पद्धती अभ्यासासाठी वापरण्यात आली. एकूण 51 मृतदेहांची ऍटॉप्सी केली गेली. यापैकी 29 पुरूषांचे आणि 22 महिलांचे मृतदेह होते. तर, 43 रुग्ण हे 40 वर्षांवरील होते आणि 44 रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट दिला गेला होता. तर, यातील बर्‍याच रुग्णांना सहव्याधी होत्या. जशा की, डायबिटीस, उच्च रक्तदाब आणि किडनी विकार .

CORONA
आरोपी विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

संशोधनात काय आढळले ?

जवळपास 90 टक्के रुग्णांमध्ये (44) फुफ्फुस खराब झालेले आढळून आले. तर, 39 रुग्णांच्या ह्रदयाच्या स्नायूंना इजा झालेली आढळली. तर, 24 रुग्णांच्या किडनीवर परिणाम झाला होता आणि 29 रुग्णांच्या यकृतात बदल झालेला आढळला. दोन तासांपुर्वी मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी तात्काळ संपर्क साधून ऍटॉप्सी करण्यासाठी संबंधित नातेवाईकांची रितसर परवानगी घेण्यात आली. शिवाय, ऍटॉप्सी करताना मृतदेहांतून संसर्ग होऊ नये म्हणून डाॅक्टरांनी पूर्ण सुरक्षित ड्रेस कोड घातला होता.

आता पर्यंत कोरोना मृत्यू फुफ्फुसात संसर्ग झाल्याने होत असल्याचे समोर येत होते. मात्र, इतर अंतर्गत अवयवांवर देखील दुष्परिणाम करून मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. हृदय, यकृत, मूत्रपिंड, जठर, स्वादुपिंड अशा अवयवांचे टिश्यू घेण्यासाठी ऍटोप्सी पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीत देहाची कोणतीही चिरफाड न करता नेमक्या अवयवाचा टिश्यू सुई टोचून घेण्यात आला. यावेळी, मृत रुग्णाच्या अवयवाला सहव्याधी असल्यास संसर्गामुळे काय स्थिती झाली होती, याचे निरीक्षण करण्यात आले. यातून फुफ्फुसात प्राथमिक आणि गडद संसर्ग आढळून आला. तर इतर अवयवांच्या बायोप्सीत देखील संसर्ग झाला असल्याचे समोर आले. या अभ्यासात पॅथॉलॉजि, सर्जरी आणि रेडिओलॉजि अशा तीन विभागातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. सर्जरी विभागातील 4, पॅथॉलॉजी विभागातील 3 तर रेडिओलॉजी विभागातील 2 अशा एकूण 9 तज्ज्ञांनी हा अभ्यास केला. या स्टडीमध्ये डॉ अजय भांडारवार ,डॉ गिरीश बक्शी ,डॉ एहम अरोरा ,डॉ निखिल ढिमोळे ,डॉ संजय बिजवे ,डॉ शुभांगी अगाळे ,डॉ मेघा किनाके ,डॉ शिल्पा डोमकुंडवार, डॉ योगेश ठुबे या डॅाक्टरांनी सहभाग घेतला होता.

जेजे समुहातर्फे केलेला अभ्यास

सर्जिकल अँड एक्सपिरिमेंटल जर्नल मध्ये हे प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, या अभ्यासासाठी लागणार्या ऍटॉप्सी काही भोपाळ, अहमदाबाद आणि नवी दिल्लीतून ही करण्यात आल्या आहेत. या संशोधनासाठी आयसीएमआरनेच ऍटॉप्सी करण्याचा सल्ला दिला होता. सेंट जॉर्ज रुग्णालयात या टीमने ऍटॉप्सी केली. कारण, सेंट जॉर्ज रुग्णालय हे कोविड रुग्णालय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.