मुंबईतून कोरोनाची साथ गेली ? रुग्णदुपटीचा कालावधी 139 दिवसांवर

मुंबईतून कोरोनाची साथ गेली ? रुग्णदुपटीचा कालावधी 139 दिवसांवर
Updated on

मुंबई : मुंबईतील कोविडरुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 139 दिवसांवर पोहचला आहे. तर, सर्व प्रभागात हा कालावधी 100 दिवसांच्या पुढे आहे. सर्वाधिक कालवधी लालबाग परळ एफ दक्षिण 296 दिवसांचा आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर कोविडचे संक्रमण नियंत्रीत ठेवण्यात पालिकेला यश येत आहे. पश्चिम उपनगरातील मालाडपासून दहिसरपर्यंतच्या पट्ट्यात कोविडचा कहर कायम होता. त्या भागातही कोविड आता नियंत्रणात येत आहे. मुंबईत कोविड वाढीचा दर 0.50 पर्यंत खाली आला आहे. शहरातील एकाही विभागात कोविड वाढीचा दर 0.70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

लोकप्रतिनिधी आणि मुंबईतील नागरीकांच्या सहकार्यामुळे कोविडवर नियंत्रण मिळवण्याच्या उपाय योजनांना बळ मिळत आहे. मिशन झिरो हे पालिकेचे ध्येय असून ते गाठवण्यासाठी नागरीकांची साथ मिळेल असा विश्वास आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

शहरातील चार प्रभागात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी 175 दिवसांच्या पुढे आहे. यात, सॅन्डहस्ट रोड बी प्रभाग 180 दिवस, जी उत्तर दादर, माहिम, धारावी 181 दिवस, वरळी प्रभादेवी जी दक्षिण 186 आणि ए कुलाबा फोर्ट प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 198 दिवसांचा आहे. तर 150 पेक्षा दिवसांचा कालावधी 6 प्रभागांमध्ये आहे. यात, एच पुर्व वांद्रे खार पुर्व प्रभागात 151, अंधेरी जोगेश्वरी पुर्व के पुर्व 158, घाटकोपर एन प्रभागात 158 दिवस. दादर, पुर्व माटूंग, शिव एफ उत्तर प्रभागात 160,गोवंडी देवनार एम पुर्व प्रभागात 161 आणि भायखळा माझगाव ई प्रभागात 174 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत.

125 ते 150 दिवसांच्यादरम्यान सात प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. यात मालाड पी उत्तर 125 दिवस, ग्रॅन्टरोड मलबार हिल डी प्रभागात 126 दिवस, कुर्ला एल प्रभागात 126 दिवस, मुलूंड टी प्रभागात 132 दिवस, मरिन लाईन्स सी प्रभागात 137 दिवस,भांडूप विक्रोळी एस प्रभागात 149 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. तर, गोरेगाव पी दक्षिण प्रभागात 124 दिवस, वांद्रे खार सांताक्रुझ पश्चिम एच पश्चिम 122 दिवस, अंधेरी जोगेश्वरी के पुर्व प्रभागात 122 दिवस दहिसर आर उत्तर प्रभागात 112 बोरीवली आर मध्य 106 आणि कांदिवली आर दक्षिण प्रभागात 105 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 

  • 25 ऑगस्ट -- 93 दिवस
  • 14 सप्टेंबर -- 54 दिवस 
  • 1 ऑक्टोबर -- 66 दिवस 
  • 10 ऑक्टोबर -- 69 दिवस 
  • 21 ऑक्टोबर --102 दिवस 

रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी असेल तर साथ संपली असे मानले जातेे. मुंबईतील सरासरी रुग्णावाढीचा दर 0.50 टक्के आहे. तर एकाही प्रभागात रुग्णवाढीचा दर 0.70 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. दहिसर आणि बोरीवली या दोन प्रभागात रुग्णवाढीचा दर 0.66 टक्के असून हा शहरातील सर्वाधिक दर आहे.

corona doubling rate in mumbai reached on 139 days big relief to citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.